इतिहास आणि भूगोल 2
खरं म्हणजे Grand Canyon इतिहास आणि भुगोलाचे एक सुंदर संमिश्रण आहे। इथे पृथ्विचा इतिहास दिसतो या दरीच्या अनेक थरांमध्ये। सगळ्यात खालचा थर कोट्यावधि वर्षांपुर्विचा, त्या नंतरचा थर लक्षावधि वर्षे नंतरचा, त्याच्या वरचा तसाच नंतरचा। प्रत्येक थराचा रंग वेगळा। इथे भूगोल दिसतो कोलोराडो नदीच्या रूपाने; ही नदी पूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागावरुन वहायची पण आता हीच नदी जवळ जवळ मैलभर खोल वहाते. इथे दोन्ही, इतिहास व भूगोल यांचे Time हेच fixed dimension दिसते। इथे यूरोपियन येण्यापुर्वी हजारो वर्षे इंडियन रहात होते पण ते निसर्गाशी समरूप होउन, इथे dynamic dimension नव्हते। फक्त इतिहास, भूगोल व Time.
मी जेंव्हा Grand Canyon पाहिले तेंव्हा मला का कुणास ठाउक पण इतिहास व भुगोलाचा हा संगम पाहून आइंस्टाइन ची Theory of Relativity आठवली होती किंवा किंबहुना त्याची Time Space Continuum ही संज्ञा आठवली होती। इतिहास व भुगोलाप्रमाणे आपण Time व Space ला देखील स्वतंत्र समजतो। पण तसं पहायला गेलं तर इतिहास म्हणजे Time व Space म्हणजे भूगोल नाही का?......

0 Comments:
Post a Comment
Links to this post:
Create a Link
<< Home