Tuesday, April 15, 2008

इतिहास आणि भूगोल

माझ्या परदेश प्रवासाची सुरुवात २००१ मध्ये अमेरीकेपासून झाली। तेंव्हाच मला जाणवलं की कुठलाही देश बघण्यापुर्वी त्याचा इतिहास आणि भूगोल यांची ओळख करून घ्यावयास हवी कारण तो देश मग आपल्याला जास्त कळतो। पण मला वाटतं या दोन विषयांचा विचार आपण नेहमीच स्वतंत्रपणे करतो; पण या दोघांत काही परस्पर सम्बन्ध असू शकेल?

इतिहास म्हणजे बदल --अगदी क्रांति नसेल पण बदल --हा बदल माणसं -- विशिष्ठ माणसं घडवून आणतात। या उलट भूगोल म्हणजे मुख्यतः निसर्ग। इतिहासात लढ़ाया येतात, आक्रमणं येतात। माणसं इतर माणसांव्ररच नव्हे तर निसर्गावरही आक्रमण करतात. इतिहासाची दोन dimensions: पहिलं व fixed dimension म्हणजे Time व दुसरं आणि dynamic dimension म्हणजे माणसाची आक्रमकता व त्याचा greed. भुगोलाला एकच dimension: काळ किंवा Time। बरेचसे भौगोलिक बदल कालपरत्वेहोतात. भूकम्प, त्सुनामी हे जरी याला अपवाद असले तरी या घडामोडी निसर्गाचाच एक आविष्कार असतो। फक्त काळाबरोबर वाहत गेलं तर इतिहास घडत नाही, भुगोलात क्वचित बदल होऊ शकतील --यूरोपियन अमेरिकेत येण्यापुर्वी तिथे हीच परिस्थिति होती कारण तिथल्या स्थानिक (red)indians लोकानी निसर्गावर/पर्यावरणावर कधीच आक्रमण केलं नाही। दोन वर्षापुर्वी मी Yosemite Park ला भेट दिली तेंव्हा तिथल्या माहितीपत्रात चक्क लिहिलं होतं की यूरोपियन settlers जेंव्हा तिथे पहिल्यांदा आले तेंव्हा त्याना तिथल्या indians ची जंगलातल्या मोठ्या झाडांखाली आग पेटवून द्यायची प्रथा रानटी वाटली पण नंतर त्यांच्या लक्ष्यात आलं की हीच पद्धत जास्त पर्यावरण-अनुकूल आहे. यूरोपियन लोकानी या स्थानिक इंडियन लोकावर आक्रमण करून इतिहास घडवला पण त्यानी देखील पोटापाण्याच्या प्रश्नापलिकडे निसर्गावर आक्रमण केलं नाही। किंवा याचं उत्तर थोडसं वेगळंही असू शकेल।

२००१ मध्येच आम्ही माझ्या एका मित्राकडे East Coast ला Connecticut या राज्यात गेलो होतो। मला New England पहायचं होतं। तो आम्हाला जवळच्या एका गावात घेउन गेला। या गावाची स्वतःची Historical Society होती। तिथलं एक घर ३००/३५० वर्षे जूनं होतं। पण त्यातील प्रत्येक पुरातन गोष्ट --शेतकी अवजारे, घरगुती वस्तु --जपून ठेवली होती। त्या घराची वंशज प्रत्येक रविवारी दुपारी त्यांचा ३०० वर्षापुर्विचा वेष परिधान करून पाहुणे-पर्यटकांचे स्वागत करायची व त्यानां आपले घर दाखवायची। आमचंही स्वागत झालं व घराचा काही भाग दाखवुनही झाला व अनपेक्षितपणे आमच्या यजमानिण बाई थाम्बल्या म्हणाल्या, " तुमच्या ३५०० वर्षाच्या इतिहासाच्या समोर आम्ही आमच्या ३५० वर्षाच्या इतिहासाचा काय बडेजावपणा मारायचा?" तिच्या त्या विधानाने मला तेंव्हा बरं निश्चित वाटलं पण नंतर भारतात परतल्यावर वाटलं की आपणही निदान स्वगत म्हणायला हवं होतं बाई गं तुमचा इतिहास छोटा म्हणुन तुमचा भूगोल शाबूत व आमच्या दीर्घ इतिहासानेच आमच्या भुगोलाची वाट लावलीय. मला वाटतं तेंव्हा माझ्या डोळ्यासमोर नाहीशी झालेली जंगले व रोडावलेल्या नद्या नव्हेत तर ठाणे-बेलापुर परिसरातील दगडांसाठी फोडून अंतर्गोल केलेले लहान मोठे डोंगर व वीटमातीसाठी देखण्या जमिनीत पाडलेले कुरूप खड्डे आले असावेत.

East Coast पाहिल्यानंतर आम्ही Grand Canyon पहायला गेलो होतो। Grand Canyon म्हणजे कोलोराडो नदीने निर्माण केलेली एक प्रचंड दरी। मात्र मला माझी इतिहासाची व्याख्या ज़रा बदलावयाला लागली। मानव-विरहित इतिहास देखील असू शकतो। Grand Canyon म्हणजे मानव-पूर्व पृथ्विचा इतिहास .....

0 Comments:

Post a Comment

Links to this post:

Create a Link

<< Home